येसाजी कंक
जे स्वराज्य दोही होते ते हत्तीच्या पायाखाली गेले तर काही स्वामिनिष्ठ होते त्यांनी हतीलाही नमवले.
अशाच एका रणझुंडार मावळ्याची कथा !
स्वराज्य निर्माण करावे ही समज आल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार स्वराज्याची.सेवा करणाऱ्या मावळ्यांमध्ये शूर शिलेदार येसाजी कंक यांचे! स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाला तोड नाही. जी लढाई समोर आली त्या प्रत्येक लढाईला त्यांनी धैर्याने तोंड दिले आणि विजय संपादूनच ते माघारी परतले. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांना किती विश्वास होता हे दर्शवणारा एक प्रसंग एक नाव आवर्जून घ्यावे लागते ते म्हणजे आपल्या मावळ्यांच्या सामर्थ्यावर इतिहासाच्या पानावर आपल्याला सापडतो. तोच आज तुमच्यासमोर उलगडतो आहोत.
१६७६ साली राज्याभिषेक संपन्न झाल्यावर महाराज दक्षिण काबीज करण्याच्या मोहिमेवर निघाले. आदिलशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी कुतुबशहाला सोबत घेतले होते. त्यामुळेच महाराज कुतुबशहाच्या भेटीस निघाले. भागानगरीत महाराजांच्या सर्व लवाजम्याचे थाटामाटात स्वागत करण्यात आले.
१६७६ साली राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेकडे कूच केली.मोगल शाही संपवण्यासाठी त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी हात मिळवणी केली गोवळकोंड्यात महाराजांचं जंगी स्वागत झालं.निजामशाही मुगल शाही आदिलशाही अश्या साऱ्या शह्यांच्या उरावर उभ राहून स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा आलाय म्हणून लोकांनी खूप गर्दी केली महाराजांसोबत सरनोबत हंबीरराव मोहिते ,येसाजी कंक इत्यादी निवडक मावळे होते .या सगळ्यांनी महालात प्रवेश केला.
महाराजांनी राजमहालात प्रवेश केल्यावर कुतुबशहाने स्वतःहून पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. महाराज स्थानापन्न होताच कुतुबशहाने त्याला मघापासून सतावत असलेला प्रश्न विचारला, राजाजी आपकी फौज तो बहुत बडी है लेकीन इसमें हाथी क्यूँ नही है? आपकी फौज देखकर हमे बडे खुशी हुए लेकीन ताजू ब की बात ये हे की आपकी फौज मे हमने हाथी नही देखा. तानाशहाजी ऐसा कुछ नही है, आमच्याकडे पन्नास हजार हत्ती आहेत मतलब एक एक सिपाही एक हाथिके बराबर है. जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही आमच्या शिलेदारांपैकी कोणाचीही निवड करा. किसी भी हाथी के साथ जंग करेगा. महाराजांचं हे प्रत्युत्तर ऐकून कुतुबशहा भलताच बावचळला. पण त्याचा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की एखादा माणूस हत्तीला टक्कर देऊ शकतो. त्यामुळे त्याने महाराजांच्या शिलेदारांना आजमवायचे ठरवले.
कुतुबशहाना प्रत्येक मावळ्यावर कुंचीतसी नजर फिरवली व येसाजी कडे बोट दाखवत विचारलं क्या ये सिपाई लढेगा हाथी से. महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासानं उत्तर दिलं का नाही माझा हा मावळा तुमच्या उन्मत्त हत्तीला च काय इंद्राच्या ऐरावतालही लोळण घालायला भाग पाडेल येसाजींनी देखील मान हलवून जणू महाराजांना वचन दिले की,महाराज निश्चिंत असावे, विजय आपलाच आहे.
हत्ती आणि येसाजींच्या झुंजीचा मुकाबला ठरला.किल्ल्यामागील पटांगणात शानदार गोलाकार जागा तयार केली गेली. सभोवताली माळे रचून प्रेक्षकांसाठी आणी मान्यवरांसाठी बसण्याची जागा तयार करण्यात आली आणि अखेर तो क्षण आला येसाजींनी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि नंगी तलवार हाती घेऊन आत्मविश्वासाने ते मैदानात उतरले. कुतुबशहाने सैनिकांना इशारा दिला आणि मागील दरवाज्याने साखळदंडात बांधलेला हत्ती जोरजोरात आरोळ्या ठोकत आत शिरला. त्या हत्तीला सांभाळायला जवळपास २५ हबशे होते. म्हणजे विचार करा त्या हत्तीची ताकद काय असेल..!
हबशांनी त्याला साखळदंडातून मुक्त केले आणि तो मदांध हत्ती समोर उभ्या असलेल्या येसाजींन पाहून अधिकच मस्तीत आला. त्याने चवताळत सरळ येसाजींवर चाल केली. हत्तीच्या चालीची येसाजींना जणू अपेक्षा होती त्यांनी डाव्या बाजूला उडी घेत हत्तीला चकवले. जमलेले प्रत्येक डोळे जीव मुठीत धरून तो थरार पाहत होते. हत्ती आणि माणूस या दोघांमधील लढाई हत्तीच जिंकणार याची जणू सर्वाना खात्री होती. पण केवळ येसाजींचा संघर्ष पाहायचा म्हणून ती प्रत्येक नजर तेथे हजर होती.
येसाजींनी काही वेळ हत्तीला खेळवले.समोरचा इवलासा माणूस आपल्याने भीत नाही हे पाहून हत्ती अधिकच आक्रमक होत होता. तो सर्वशक्तीनिशी येसाजींना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत होता. पण येसाजी त्याला एखाद्या खेयाप्रमाणे खेळवत होते. अजून काही वेळ असाच गेला.येसाजी खेळवत होते आणी हत्ती खेळत होता. युद्ध रंगात आले होते येसाजिला पाहून हत्ती चवताळून येसाजिच्या अंगावर धावून गेला येसाजी न डाव्या अंगाला उडी मारून हत्तीला हुलकावणी दिली हत्ती आपला वेग रोखू न शकल्या मूळे तसाच पुढे गेला हत्ती आता चवतळला होता दोन अडीच तास झुंज चालू होती कधी सततच्या धावण्याने अखेर हत्तीला धाप लागली आणि त्याची आक्रमकता कमी झाली. येसाजी जणू याच संधीची वाट बघत होते. यावेळेस त्यांनी स्वतःहून पुढे जाऊन हत्तीला जोरदार धडक दिली.
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, मातीत कमावलेल्या त्या बलदंड शरीराचा धक्का बसताच क्षणभर हत्तीही जागेवरून हलला. पण अचानक त्याने स्वत:ला सावरत येसाजींना सोंडीत पकडले. पण येसाजी हार मानतील ते कसले? त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून हत्तीच्या सोंडेतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि तलवारीचा थेट वार हत्तीच्या सोंडेवर केला...!
कुतुबशहा तर केवळ तोंडात बोट घालायचं बाकी होता. येसाजींनी घातलेला घाव हा त्या लढाईतला निर्णायक घाव ठरला. त्या जबरदस्त घावामुळे हत्तीचा सगळा जोश उतरला आणि त्याने सरळ बाहेर धूम ठोकली. हत्ती आणि माणसाच्या झुंजीत झालेला हा विजय माणसाचा नव्हता. कारण अशी अचाट कामगिरी करणे प्रत्येकाला शक्य नाही. तो विजय होता येसाजी कंक नामक सामर्थ्यांचा, त्यांच्या रांगड्या हिंमतीचा!
सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट होत होता. सर्वत्र येसाजींच्या नावाचा गजर होऊ लागला. येसाजी देखील सर्वाना अभिवादन करत होते. कुतुबशहा च्या हट्टपायी एका हत्तीचा जीव गेला होता पण महाराजांचा एक एक मावळा हा हत्तीच्या ताकतीचां असतो हे सिद्ध झालं!
कुतुबशहा न येसाजीला आपल्या गळ्यातील हार भेट देऊ केला पण येसाजीन तो हार न घेता आमचं कौतुक करायला आमचा राजा समर्थ हाय माझा हा पराक्रम माझ्या राज्याच्या चरणी अर्पण करतो अस सांगितलं इतक्यात त्यांची नजर महाराजांच्या नजरेला मिळाली आणि त्यांची छाती गर्वाने अधिकच फुलली. कारण त्या टाळ्यांच्या कडकडाटापेक्षा त्यांच्या दृष्टीने मौल्यवान होता आपल्या राजाच्या डोळ्यात आपल्याविषयी दिसणारा अभिमान!
धन्य ते येसाजी !
धन्य ती त्यांची निष्ठा !!
🙏🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🙏
Click here👉
https://historyofmarathawarriors.blogspot.com/2020/10/yesaji-kank.html
Comments
Post a Comment